महाराष्ट्र ग्रामीण

गोदिंया-चांदाफोर्ट रेल्वेला मागेपुढे सहा बोगी वाढवा – मुन्नाभाई नंदागवळी यांची मागणी

अविकुमार मेश्राम जिल्हा प्रतिनिधी

गोंदिया :
अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या गोंदिया ते चांदाफोर्ट ही रेल्वे धावत आहे. पण गेल्या दहा वर्षांत अनेक अडचणी या मार्गावर निर्माण झालेल्या आहेत. ब-याचदा रेल्वे ह्या वेळेवर कधी ये जा करत नाही. घोडा कुठे पेंड खातो हे समजत नाही. अशातच कोरोना नंतर या मार्गाच्या धावणाऱ्या रेल्वे कमी झाल्यामुळे आणखी मोठा त्रास नागरिकांना होत आहे. याबरोबरच धावत असणाऱ्या रेल्वेला एकदम कमी बोगी लावल्या जात असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. याचा नागरिकांना खूप त्रास होतो. म्हणून गोदिंया-चांदाफोर्ट रेल्वेला मागेपुढे सहा बोगी वाढवा. अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते मुन्नाभाई नंदागवळी यांनी केली आहे.

गेल्या अनेक पिढ्यांनी रेल्वेमध्ये प्रवास केला आहे. कोळसा रेल्वे पासून तर विजेच्या रेल्वे पर्यंत अनुभवल्या आहेत. गेल्या दहा वर्षामध्ये रेल्वे खाजगीकरण झाल्यामुळे नागरिकांना रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा होत चालला आहे. कारण रेल्वे पासून वाढलेल्या समस्यामूळे नागरीक त्रासले असल्याचे सांगतात.

आधीच्या काळी रेल्वे प्रवास हा आनंदाचा म्हणून लोक आनंदाने करायचे. पण रेल्वे वेळेवर येणे, लाभासाठी मालगाड्या सोडणे, आवश्यक अशा रेल्वे न सोडता कोणत्याही रेल्वे पाठविणे. प्रवासी रेल्वेला कमी प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये आता धावणाऱ्या रेल्वेला चक्क बोग्या कमी लावल्या जातात. परंतु याकडे नागरिकांच्या योजना मिळवून देणारे लोकप्रतिनिधी हे लक्ष घालत नाही. नागरिकांची सेवा केली जात नाही.

दररोजच्या कामाला जाणारे मजूर, रोजच्या आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी जाणारे नोकरी करणारे कर्मचारी, प्रशिक्षण करणारे प्रशिक्षणार्थी, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी ही मंडळी दररोज प्रवास करतात. यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. कारण रेल्वेला बोगी कमी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
———————-
मी नेहमी प्रवास करतो, कोरोनापासून रेल्वे कमी झाल्या त्यामुळे प्रचंड गर्दी रेल्वे मध्ये असते. पाय ठेवायलाही जागा राहत नाही एवढी गर्दी असते. दिवसेंदिवस नागरिकांची रहदारी वाढत आहे. लग्नसराई सुरू आहे. तेंदूपत्ता कामगार वर्ग ये जा करत आहे. नियमित प्रवासी तर आहेतच. अशा अनेक कारणांमुळे गर्दी अफाट वाढली आहे. म्हणून रेल्वेला बोगी वाढविणे आवश्यक आहे.
– मुन्नाभाई नंदागवली
————————

चांदाफोर्ट ते गोदिंया ही दुपारची रेल्वे सुरू करा.
कोरोना आधी दुपारची रेल्वे येत होती, ती बंद असल्याने फक्त एकच रेल्वे चांदाफोर्टकडून गोदिंया येते. त्यामुळे प्रचंड नागरिकांची गर्दी वाढली आहे. सारख्या गच्च भरलेली रेल्वे ये जा करत आहे. त्यामुळे कोरोना पूर्वी असलेल्या रेल्वे सुरू कराव्या अशीही नागरिकांची मागणी आहे.

रेल्वे वेळेवर सोडावी.
रेल्वे या आता काही वर्षांपासून कधीच वेळेवर आली आणि गेली पण नाही. याला कारणीभूत रेल्वे प्रशासन आहे. नियमितपणे प्रवासी रेल्वे सुरु ठेवायला पाहिजे आहे. ही सुध्दा प्रवाशांची मागणी आहे.

मालगाड्या व सुपरफास्ट गाड्या या मार्गावरून कमी कराव्या.
गोदिंया ते चांदाफोर्ट मार्गावर प्रवासी रेल्वे ह्या मालगाड्या व सुपरफास्ट गाड्यामूळे वेळीअवेळी धावू लागल्या आहेत. कारण प्रवासी रेल्वेपेक्षा मालगाड्या व सुपरफास्ट यांना जास्त महत्त्व दिले जाते. हे संपूर्ण: चुकीचे आहे. ज्या उद्देशाने रेल्वे सुरू केली आहे. ते उद्देश सदर विभागाने प्रामाणिकपणे पुर्ण करावे, ही नागरिकांची आर्तहाक आहे. म्हणून या मार्गावरून मालगाड्या व सुपरफास्ट या गाड्या बंद कराव्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button