महाराष्ट्र ग्रामीण

Kisan Andolan : शेतकऱ्यांचे आंदोलन दोन दिवस स्थगित; सरकारने दिला ‘हा’ महत्वाचा प्रस्ताव

शेतकऱ्यांचे आंदोलन

Farmer Protest : शेतकरी संघटनांची सरकार सोबत सुरू असलेली बैठक संपली असून केंद्राने एमसएसपीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. यामुळे दोन दिवस हे आंदोलन स्तगित करण्यात आले आहे.

Farmer Protest : रविवारी रात्री सरकारशी झालेल्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलकांनी दोन दिवस आंदोलन स्थगित केले आहे. दोन दिवसांत सरकारने सादर केलेला MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमतीचा नवीन प्रस्ताव शेतकरी समजून घेतील आणि त्यानंतर आपले धोरण ठरवणार आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पीयूष गोयल आणि नित्यानंद राय या बैठकीला उपस्थित होते.

केंद्राने शेतकरी आंदोलकांना एमएसपीचा नवा प्रस्ताव दिला आहे. शेतकरी येत्या दोन दिवसांत सरकारच्या या प्रस्तावाचा अभ्यास करणार आहे. या बाबत माहिती देतांना शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर म्हणाले, ‘आम्ही सरकारने दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करणार आहोत. यामुळे १९ आणि २० फेब्रुवारीला या बाबत तज्ज्ञांची मते घेऊन त्या आधारावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button