महाराष्ट्र ग्रामीण

उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते भाई अमन शिवसेना (उबाठा) मध्ये जाहिर प्रवेश

सामाजिक कार्यकर्ते भाई अमन शिवसेना (उबाठा) मध्ये जाहिर प्रवेश

उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते भाई अमन शिवसेना (उबाठा) मध्ये जाहिर प्रवेश
यवतमाळ प्रतिनिधी  : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आपले अस्तित्व कायम राखत नविन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश घडवून आणण्यास सुरुवात केली असुन पुसद येथील जनसंवाद यात्रेत माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माजी मंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांनी जाहीर प्रवेश केल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.पक्षप्रवेश सोहळ्यावेळी भाई अमन यांचे खंदे समर्थक डॉ.गणेश नाईक यांचेसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य मुस्लिम बांधव शिवसेनेत दाखल होत आहेत.आज भारतीय जनता पक्ष फक्त भोंग्या सारख्या व लव्ह जिहाद सारखे विषय निर्माण करून समाजात तेढ निर्माण करत आहेत.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या वेळी विरोधकांकडून मशिदीच्या भोंग्यावरून वाद सुरू करण्यात आला.त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण करू दिले नाही. केंद्र सरकारने जनतेला गेल्या ८ वर्षामध्ये जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे जनता जाब विचारेल या भीतीने भाजपचे नेते, प्रवक्ते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काही असंस्कृत लोकांना पुढे करून वाद विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे भाई अमन यांचे कडुन सांगण्यात आले.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांच्या पाठीशी एक कुटुंबप्रमुख व लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच राहीन.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणारे भाई अमन यांच्यासह डाॅ.गणेश नाईक यांनी ही शिवबंधन बांधुन प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button