महाराष्ट्र ग्रामीण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलची जिल्हा कार्यकारीणी जाहिर

बैठकीत नवनियुक्त पदाधिका-यांना दिली नियुक्ती पत्र

प्रतिनिधी यवतमाळ

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी ओबीसी सेल ची जिल्हा कार्यकारीणी जाहिर केली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिका-यांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

प्रमोद शिंदे यांची यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता प्रमोद शिंदे यांनी जिल्हा कार्यकारीणी घोषीत केली आहे. यामध्ये उपाध्यक्ष पदी नितीन सरोदे, सौ पूनम टापरे, नंदकिशोर गावंडे यांची तर जिल्हा सरचिटणीस पदी उमेश इंगोले, यवतमाळ तालुका अध्यक्ष गणेश डाखोरे, यवतमाळ शहर अध्यक्ष अनिल वाघचौरे, यवतमाळ तालुका कार्याध्यक्ष वर्षा इंगोले, बाबुळगाव तालुका अध्यक्ष सुधाकर वनमाळी, दारव्हा शहर अध्यक्ष विकास सोनवणे, दारव्हा तालुका अध्यक्ष सचिन ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली. याव्यतिरीक्त उमरखेड तालुका अध्यक्ष कृष्णा अशोक उमळे, कळंब तालुका अध्यक्ष राजू धोपटे, कळंब उप तालुका संघटक रेखा दत्ता बावणे, कळंब तालुका संघटक कल्पना बावणे, दिग्रस उप तालुका अध्यक्ष दिशा अंबादास भगत, दिग्रस सर्कल प्रमुख ज्योती टोले, आर्णी उप तालुका प्रमुख शालिनी संदीप काळे, आर्णी उपतालुका संघटक अर्चना बाळू इंगळे, घाटंजी शहर अध्यक्ष पवन राजू पुट्टेवार, उपतालुका अध्यक्ष पूजा धुर्वे, बाभूळगाव विभाग अध्यक्ष सुरेखा चांदे, अकोला बाजार सर्कल अध्यक्ष सीमा तायडे, अकोला बाजार विभाग अध्यक्ष रंजना खंडारे, महागाव तालुका अध्यक्ष रुपेश नथू मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ. क्रांती राऊत धोटे, जिल्हा कार्याध्यक्ष तारीक लोखंडवाला, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राजु गुल्हाणे, सरचिटनीस विवेक देशमुख, पक्ष निरीक्षक श्रीमती दुर्गा ठाकरे, उत्तम गुल्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. पुनम टापरे, शहर अध्यक्ष लालजी राऊत, युवक जिल्हा अध्यक्ष योगेश धानोरकर सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. घोंगडे जिल्हा उपाध्यक्ष यांनी केले. विशेष म्हणजे याप्रसंगी जिल्हयातील अनेकांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ओबीसी सेल मध्ये प्रवेश घेतला. लवकरच जिल्हयात दौरा करुन पक्षबांधनी करीता प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button