महाराष्ट्र ग्रामीण

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाकडून हज यात्रेकरुंचा सत्कार

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाकडून हज यात्रेकरुंचा सत्कार

 प्रतिनिधी यवतमाळ

 भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा यवतमाळच्या वतीने हज यात्रेकरूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अल्पसंख्यांक मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. विशेष म्हणजे मान्यवरांच्या उपस्थितीत अनेकांनी अल्पसंख्यांक मोर्चात प्रवेश केला. हा कार्यक्रम यवतमाळ येथील भावे मंगल कार्यालयात संपन्न झाला.

 या कार्यक्रमाला मा.श्री. आसिफ खान अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हज समिती (राज्य मंत्री दर्जा), मा.श्री. जुनेद खान महामंत्री, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक मोर्चा, मा. श्री. रमजान अन्सारी अल्पसंख्यांक मोर्चा, विदर्भ संपर्क प्रमुख, मा. श्री. तारेन्द्र बोर्डे जिल्हाध्यक्ष, भाजपा, यवतमाळ मा.श्री.श्याम जयस्वाल माजी जि. प. उपाध्यक्ष, मा. सौ. मायाताई शेरे महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस, मा. सौ. रेखाताई कोठेकर यवतमाळ जिल्हा महामंत्री, सौ. किर्तीताई राऊत, भाजपा महिला मोर्चा,  मा. श्री. राजु पडगिलवार यवतमाळ जिल्हा महामंत्री, भाजपा मा. श्री. बाळासाहेब शिंदे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष, सौ रेणू शिंदे माजी जि.प. सदस्य, सायरा रऊफ खान, मौलाना हाफीज इब्राहीम खान साहब, सालीक पटेल, राजिक कुरेशी, अथर खान, अशपाक खिलजी, राजु चव्हाण, मोहसीन मलनस, ताहेर मिर्झा, नासीर नियाजी सर, शुभम पुरी हे उपस्थित होते. यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे  भ्रमनध्वनी व्दारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन ईरफान मलनस अध्यक्ष, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, यवतमाळ यांनी केले. हज यात्रा करुन आलेल्या मुस्लीम बांधवांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी अत्यंत चांगल्या पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ईरफान मलनस तसेच आयोजकांचे कौतुक केले.

 जिल्हा कार्यकारीनी घोषीत

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाची जिल्हा कार्यकारीनी ईरफान मलनस यांनी घोषीत केली. जिल्हयातील एकून 67 तरुणांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे पदाधिकारी सर्वसामान्य जनतेची कामे करणार आहे. याशिवाय अल्पसंख्यांक मोर्चा मुस्लीम समाजाच्या समस्या सोडविण्यासोबतच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही याप्रसंगी ईरफान मलनस यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button