महाराष्ट्र ग्रामीणमाहिती तंत्रज्ञान

डॉल्बीच्या तालावर !

कवी पिंटू एस कांबळे.

मोबाईल नंबर 8080532937

——————————————

भगवा निळा,पिवळा हिरवा

डॉल्बीच्या दणक्याचा मिळतोय गारवा.

 

महापुरुषांचे विचार राहिले बासनात

थील्लर डॉल्बी वरती नाचतात

गौतमी पाटलाच्या फडात.

 

कुणाचं काय तर कुणाचं काय,

काय बोलायची सोय राहिली नाय.

काय बोलले तर म्हणे ,

आमच्या भावना दुखावल्या हाय!

 

जात नाही ती जात!

धर्म रुढीच्या परंपरा,

सुखदुःख “महाराच्या शिवापाला” ठाऊक.

 

आई जाते घरा पाठीमागे मागच्या दाराने,

धुणी भांडी करायला

बा जातोय रोजंदारीला,

बागायतदाराच्या शेतमळ्यात

 

हप्त्यावरची गाडी घेऊन पोरगं जातय

पुढार्‍याच्या प्रचाराला. .. . !

पुढाऱ्यांना देखील हवे असतात,

मागणं फिरणारी!

 

इथूनच निर्माण होतात

तरुण विचाराची तरुण मंडळे. . .

आणि मग सुरुवात होते,

जाती-जातीनुसार गळ्यात

रंगाचा बेरंगी पट्टा बांधून,

जयंती यात्रा उत्सव साजरी करायला

डॉल्बीच्या तालावर नाचायला.

 

नोकरी नाही म्हणून घरात तर,

पोरगं गुडघ्याला बाशिंग बांधून 40 व्या वर्षी बसत.

नुकतंच सहा महिने लग्न झालेली पारू,

“हळद”अंगावरची धुऊन जाण्या अगोदरच,

नवऱ्याला कायमची सोडचिठ्ठी देऊन,

“माहेर वाशिन” म्हणून ठामपणे राहिलेली असते.

 

पोराचं शिक्षण,

पोरीच्या लग्ना पायी काढलेलं

व्याजानं सावकाराचं कर्ज,

फिटता फिट ना म्हणून

खाजगी सावकारी करणाऱ्या,

सावकाराच्या बुलेटच्या फेऱ्या

वाढू लागलेल्या आहेत.

 

शेती उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने,

बँकेच्या कर्जाच्या थकबायी पोटी,

दारात आलेला बँकेचा साहेब

काळवंडलेल्या चेहऱ्याने रिकाम्या

हाती परत जातो.

 

एवढी सारी गणित डॉल्बीत

नाचणाऱ्या त्या पोराला,

समजून सांगायला गेल्यावर

चक्कर येईल.

 

त्यापेक्षा जयंती यात्रा उत्सवात

डिजिटल डॉल्बी जोरात वाजू दे!

गौतमी पाटलीन बाई जोरात नाचू दे,

कदाचित नाही आली तर,

तिची गाणी तरी नक्की वाजू दे!

 

सुखदुःख हवंय कशाला,

ते जाऊदे तिकडं,

महाराच्या शिवरापाला. . . . !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button