महाराष्ट्र ग्रामीण

जनता हायस्कुलचे शेख बाबू गुरुजी “हज” यात्रेस रवाना ..

नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर

 नायगाव शहरातील जनता हायस्कुलचे शिक्षक व नरसी येथील रहीवासी शेख बाबू हाजी अब्दुल रहेमानसाब व त्यांच्या पत्नी हे मुस्लीम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या ” हज” यात्रेसाठी ११ मे रोजी सपत्नीक रवाना होत आहेत.

प्रत्येक मुस्लिम अनुयायाला हज बदल धार्मिक भावना असते. हज्ज करण्यासाठी जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियातील मक्का शहरात जमतात तेथे हज यात्रेकरू अनेक दिवस मुक्काम करतात आणि विविध धार्मिक परंपरांचे पालन करतात हज्ज हा इस्लाम धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे ज्याच्यावर हज खर्च आहे त्याने एकदा तरी जीवनात जायलाच पाहिजे असा इस्लाम धर्माचा नियम आहे. यावर्षी नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी व जनता हायस्कूल नायगाव चे शिक्षक शेख बाबू हाजी अब्दुल रहेमानसाब व त्यांची पत्नी शेख कौसर बाबु हे पवित्र हज साठी दिनांक ११ मे २०२४ रोजी रात्री रवाना होणार आहेत. नरसी नायगाव हे शहर सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे. नरसी नायगाव मध्ये एक मुस्लिम बांधवांची परंपरा आहे जे कोणी हज साठी जाते त्याच्या रवानगीसाठी त्यांच्यासोबत बसस्थानकापर्यंत पायी जातात व तिथून त्यांना रवाना करतात. हज यात्रा सुखरूप व्हावी म्हणून त्यांना माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, भाजपाचे नेते श्रावण पाटील भिलवडे, उप नगरअध्यक्ष विजय पा. चव्हाण, माधव अप्पा बेळगे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे, नरसीचे सरपंच गजानन भिलवंडे, मोहन पा. भिलवंडे, पोलीस पाटील इब्राहीम बेग पटेल, डॉ. शेख अनिस,सय्यद पिरसाब. अणिताताई गोपछडे, आरीफ सर,वशिम शेख आहेमद सेट .शेख रॷफ,मुनीर सय्यद. जावेद शेख आहेमद सेट .पत्रकार यांसह नांदेड जिल्ह्यातील पाहूणे, मित्र मंडळीनी सन्मानपुर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button